नेवासा – नेवासा फाटा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने नेवासा तालुक्यात बेकायदा देशी-विदेशी मद्य विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकून दोघांना अटक केली. जवळपास सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत माहिती अशी की, नेवासाफाटा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक एस.ए. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक प्रशांत पाटील, ए. के. शेख, महीला जवान श्रीमती राठोड, श्रीमती जाधव आणि वाहन चालक दीपक बर्डे यांच्या पथकाने शनिवार (दि. २६) रोजी सलाबतपूर येथे बेकायदेशीपणे देशी – विदेशी मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल आणि गुत्यांवर धाड घालून देशी-विदेशी मद्य जप्त करत १ लाख २८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी बाळासाहेब आसाराम शिंदे (रा. जेऊर ता. नेवासा) व सुशीला विनायक खंदारे (रा. सलाबतपूर ता. नेवासा) या दोघांना अटक करण्यात आली. बाळासाहेब शिंदे यांच्या ताब्यातून एका मोटारसायकलसह ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल तर सुशीला खंदारे यांच्याकडून ३६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या धाडसी कारवाईबाबत कौतुक केले जात आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.