नेवासा – अॅसिड टाकण्याची धमकी देवून तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय मुलीला आळंदी येथे पळवून नेत अत्याचार केलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे यास रविवारी (दि. २७) धुळे येथून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयात हजर केले असता कन्यायालयाने आरोपीस दि. ३० पर्यंत. पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेतील पिडीतेच्या दि. ८ जुलैच्या फिर्यादीनुसार, आण्णासाहेब ऊर्फ तान्हाजी प्रल्हाद आंधळे याने व त्याचे नातेवाईक प्रविण प्रल्हाद आंधळे, जनाबाई प्रल्हाद आंधळे (सर्व रा. सोनेसांगवी, ता. शेवगाव) अनोळखी गाडीवरील चालक यांनी पिडीत मुलगी हिला दि. २ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास लग्नाचे अमिष दाखवून चाराचाकी वाहनात बळजबरीने बसवून पळवून नेले. तसेच तू जर आरडा ओरडा केला तर तुझ्या अंगावर अॅसिड टाकू अशी धमकी देवून पिडीत मुलीला वरील आरोपींना आळंदी (ता. हवेली, जि. पुणे) येथे नेले. सुनिता आंधळे व प्रविण आंधळे (रा. आळंदी) यांनी फिर्यादर्दी व आरोपी यांना एका खोलीत डांबून ठेवले. तेव्हा आरोपी आण्णासाहेब आंधळे याने फिर्यादी पिडीतेवर अत्याचार केला. याप्रकरणी शेवगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आंधळे पसार झाला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी फरार आरोपीच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके नेमली. आरोपी गेल्या २० दिवसांपासून वेळोवेळी त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलून पुणे, अहिल्यानगर, जालना, आणि संभाजीनगर येथे राहत होता. संतोष मुटकुळे यांना २६ जुलैला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फरार आरोपी आण्णासाहेब आंधळे हा जिल्हा धुळे येथून ट्रकमध्ये बसून मध्यप्रदेशकडे पळून जात असल्याची माहिती मिळाली. शेवगाव पोलिसांनी धुळे पोलिसांच्या मदतीने नमुद गुन्ह्यातील फरार आरोपीला जिल्हा धुळे येथून रविवारी ताब्यात घेतले आणि त्यास दाखल गुन्ह्यात अटके केली. न्यायालयात हजर केले असता
आरोपीस ३० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव सानप, रामहरी खेडकर, भगवान सानप, शाम गुंजाळ, संपत खेडकर, ईश्वर बेरड, राजु बढे, सचिन पिरगळ, आणि नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुड्डू यांनी केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.