ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
काडतुसे

नेवासा- शहरात अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या नेवासा येथील एका तरूणाला कोतवाली पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. सचिन पांडुरंग घोरतले (वय ३८ रा. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसे असा सुमारे ५१ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काडतुसे

पोलीस अंमलदार सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शनिवारी (२६ जुलै) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास केली. पोलिसांनी एमएसईबी ऑफिसच्या गेटकडून कानडे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नगर कॉलेजच्या भिंतीच्या पाठीमागे, दादा पीर दर्याच्या समोर संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर संशयित आरोपीला पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडे ६ एमएम आकाराचे जिवंत काडतुसे आणि मॅगझीनसह गावठी कट्टा आढळून आला.

काडतुसे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

काडतुसे
काडतुसे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

काडतुसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *