नेवासा : आचार्य आनंदऋषी महाराज यांचे जन्मगाव असलेल्या पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ येथे प्रवीण ऋषीमहाराजांच्या प्रेरणेने साकार होत असलेल्या गुरू आनंद तीर्थसाठी नेवासा तालुक्याचे भूमिपुत्र व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी गुरू आनंदऋषी फाउंडेशनला आजोबा दगडूराम देसरडा व आई उर्मिला देसरडा यांच्या स्मरणार्थ एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
आनंद तीर्थच्या विश्वस्तपदी देखील सचिन देसरडा यांची नियुक्ती झाली आहे. सचिन देसरडा यांच्या आजी चंपाबाई देसरडा, वडील मदनलाल देसरडा, सरपंच राजेंद्र देसरडा व देसरडा परिवाराच्या वतीने सचिन देसरडा यांनी ही देणगी दिली.

आचार्य आनंदऋषींजींच्या जन्मोत्सवाच्या दिवशी उपाध्याय प्रवीणऋषीमहाराजांच्या आशीर्वादाने ही देणगी देण्यात आली आहे. गुरू आनंद तीर्थसाठी भरघोस देणगी देऊन धर्म कार्याला हातभार लावल्याबद्दल सचिन देसरडा यांचे विधानपरिषदेचे
सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार अमोल खताळ, सुवेंद्र गांधी, अनिल मोहिते, भैय्या गंधे, प्रा. भानुदास बेरड, विक्रम तांबे, पंचगंगाचे चेअरमन प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, निरंजन डहाळे, आदिनाथ पटारे, नेवासा जैन श्रावक संघाचे सदस्य अमृत फिरोदिया, राजेंद्र मुथा यांनी अभिनंदन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.