ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
कृषी

नेवासा फाटा : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी रावसाहेब घुमरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे यांनी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत सदर कार्यकारिणी जाहीर केली.

शेतकऱ्यांची हक्काची संघटना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न शासन दरबारी सोडून घेणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेची राज्य कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष निवडीची घोषणा प्रसिद्धपत्रकाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे यांनी केली. मागील गेल्या अनेक वर्षांपासून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, शासकीय योजनाची माहिती देणे, शेतकरी मेळावे आयोजन करणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील खेड्यापाडयात जाऊन सहकार महर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करून शेतकरी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे काम या परिषदे मार्फत करण्यात आले.

कृषी

जिल्ह्यातील नेते सुजय दादा विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, आ. मोनिकाताई राजळे, आ.काशिनाथ दाते, आ.अमोल खताळ, आ.शिवाजी कर्डीले, आ.विक्रमराव पाचपुते, पोपटराव पवार, हिवरेबाजार कृषी परिषदेचे उप प्रदेशाध्यक्ष सुरेश तरकसे, उद्योजक प्रभाकर शिंदे, जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, उपअध्यक्ष सचिन देसरडा, अंकुश काळे, अशोक कोळेकर, गणेश लंघे.हरिभाऊ लंघे, बापुसाहेब भोसले, दिलीपराव लांडे, अभय आव्हाड, सुरेश शेटे, किसनराव गडाख, प्रताप चिंधे, बाळासाहेब पवार, सुरेश डिके, जनार्दन पटारे, बाळासाहेब भदगले, विवेक अंबाडे, अदिनाथ पठारे, बाळासाहेब देवखिळे, सुरेश ईथापे, राजेश परकाळे, डॉ. कोलते, इंजि.विजयकुमार ठुबे, संभाजीराव मते, मनोज पारखे, आबासाहेब शिरसाठ आदींनी रावसाहेब घुमरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कृषी
कृषी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषी
कृषी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *