नेवासा – कुकाणा अंतरवली परिसरात एका लग्न सोहळ्या प्रसंगी रस्त्यावरील ट्राफिक जाम झाल्यामुळे गेल्या एक तासापासून लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कुठल्याही पदाची प्रतिष्ठा न मानता स्वतः नेवासा तालुक्यातील लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे हे गाडीतून खाली उतरत स्वतः रस्त्यावर उभा राहून अर्धा तास ट्रॅफिक हवालदार ची भूमिका बजावून रस्ता वाहनांना मोकळा करून दिला.
येणाऱ्या जाणाऱ्यांना हा तर पहिल्यांदा आश्चर्याचा धक्का बसला की चक्क आमदार रस्त्यावर रस्ता मोकळा करताना दिसतायेत हे पाहून रस्त्यावरील काही गाडी चालकांना आमदार सोबत रस्त्यावर सेल्फी फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही ना कुठल्या पदाचा गर्व ना कुठल्या पदाचा अभिमान असलेला आमदार म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे यांची नेवासा तालुक्यामध्ये ओळख आहे .

सरळ स्वतः तालुक्याचे आमदार रस्त्यावर उतरून ट्रॅफिक जाम मध्ये वाहनांना रस्ता मोकळा करून देत आहेत हे पाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आश्चर्यच वाटले काही नागरिक तर म्हणाले की आमदार हे करू शकतात हे आम्ही आजच बघितले.
लाडक्या बहिणींचा लाडक्या विठ्ठलभावाला पाहून ये जा करणाऱ्या महिला लाडक्या बहिणींनाही आश्चर्याचा धक्काच बसला व त्यांनी हात जोडून आमदारांना नमस्कार केला व एक प्रकारचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.