ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
रोड मॉडेल व्हिलेज

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – गाव नकाशा प्रमाणे असलेले शेतीचे रस्ते , गावशिवरस्ते अतिक्रमणमुक्त करणे व मोफत मोजणी करून खुले करणे तसेच शासनाच्या मदतीने रस्ते पक्के बनविणे व चिलेखनवाडी गाव नेवासा तालुक्यातील पहिले रोड मॉडेल व्हिलेज बनविण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात येऊन तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार तहसीलदार नेवासा यांना नुकतीच ठरावासह पत्र देण्यात आले त्यानुसार तहसीलदार यांनी प्रशासकीय मंजुरी देऊन श्री संदीप गोसावी उपअधीक्षक भूमी अभिलेख नेवासा यांना गाव नकाशा प्रमाणे नकाशात असलले रस्ते व गावाच्या चारी बाजूच्या असलेल्या शिव रस्त्यांची मोजणी करण्याचे व शिव हद्दी खुणा निश्चित करण्याचे आदेश देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अहवाल तहसीलदार यांनी मागवला आहे अशी माहिती लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी दिली.

रोड मॉडेल व्हिलेज

नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे रोड मॉडेल व्हिलेज संबंधात पहिली विशेष ग्रामसभा दिनांक १७ जुलै २०२५ रोजी संपन्न झाली रोड मॉडेल व्हिलेज ही संकल्पना महाराष्ट्र राज्य शेत व शिवपाणंद रस्ते चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरदराव पवळे यांच्या संकल्पनेतून पुढे आली आहे त्या संबंधातील माहिती महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी तहसीलदारांकडे पाठपुरावा करून या गावच्या चारही शिवरस्त्यांचे मोफत मोजणी करून रस्ता खुले करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे यामुळे सर्व ग्रामस्थांचे मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
सरपंच श्री भाऊसाहेब सावंत यांनी अतिक्रमित रस्त्यासंबंधी असलेली प्रकरणे निपटारा करण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत चिलेखनवाडी रोड मॉडेल व्हिलेज साठी ग्रामअधिकारी बाळासाहेब काळे यांनी पत्र देऊन सहकार्य केले रोड मॉडेल व्हिलेज करिता माजी सभापती अशोक मंडलिक ‘ माजी शिक्षणाधिकारी बी .डी .पुरी , तलाठी प्रियंका चव्हाण ,

रोड मॉडेल व्हिलेज

उपसरपंच नाथा गुंजाळ , देविदास सावंत , निवृत्त मंडल अधिकारी रमेश सावंत , नेवासा तालुका शेत पाणंद रस्ते व शिवरस्ते चळवळीचे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात (माका ) बाबासाहेब शिरसाठ , राजू गरड , सोमा भाऊमाकोणे मामा , रामभाऊ पवार मामा , तसेच ग्रामस्थ विठ्ठल पवार , शेषराव भातंबरे , काशिनाथ गोसावी , पाणीवापर सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय भातंबरे , सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब सावंत ग्रामपंचायत सदस्य सुहास गायकवाड , सुमंत कांबळे , चंद्रकांत पाडळे , आण्णा सुराशे , असाराम भोसले ,मुख्याध्यापक सुरेश सानप ,डॉ अनिल गायकवाड , भगवान अडवणे , अन्सार शेख , सुरेश कांबळे , सुनील गायकवाड , महसूल अधिकारी श्रीमती प्रियंका चव्हाण, किरण गर्जे , मच्छिंद्र सावंत , पांडुरंग मुरकुटे , रवि कांबळे , सिद्धार्थ खंडागळे , एकलव्य टायगर फोर्सचे उपाध्यक्ष राम पवार , मधुकर काटे , शिमोण कांबळे , सुभाष वासेकर , अमोल वासेकर , गोरक्षनाथ गुंजाळ संजय गुंजाळ , रावसाहेब सावंत , जालिंदर गायकवाड ‘ , माजी सरंपच सुशिल कांबळे , बाळासाहेब दळवी , दिपक नटवणे , साहेबराव गव्हाणे कैलास गायकवाड छबू आहेर गावातील बहुसंख्य शेतकरी व शेत रस्ता पीडित शेतकरी यांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे

रोड मॉडेल व्हिलेज
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रोड मॉडेल व्हिलेज
रोड मॉडेल व्हिलेज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रोड मॉडेल व्हिलेज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *