
नेवासा – नेवासाफाटा येथील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास नेवासा येथील पत्रकार शंकर नाबदे व मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांना काही गुंड प्रवृतीच्या लोकांकडून भ्याड हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.या हल्ल्याचा नेवासा प्रेस क्लबच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की नेवासाफाटा येथे गुंडगिरी व दादागिरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.मंगळवारी रात्री देखील एका व्यक्तीला मला तुझ्याकडून सिगारेट पाहिजे या किरकोळ कारणावरून मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पत्रकार शंकर नाबदे व गणेश झगरे यांना देखील मध्ये येतो म्हणून मोटार सायकल मागे ठेवलेल्या रॉडसारख्या गजाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या भ्याड हल्ल्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला.

पत्रकारावरील हया भ्याड हल्ल्याचा नेवासा प्रेस क्लबच्या वतीने निषेध करण्यात आला असून या गुंड प्रवृतीच्या लोकांचा बंदोबस्त करा,गुंड प्रवृतीच्या लोकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली.दिलेल्या निवेदनावर नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे,अध्यक्ष मोहन गायकवाड,
अशोक डहाळे,सुधीर चव्हाण,कैलास शिंदे,नाना पवार, सुहास पठाडे,शाम मापारी, मकरंद देशपांडे,पवन गरुड, रमेश शिंदे,शंकर नाबदे यांच्या सहया आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.