नेवासा- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या बनावट अॅप प्रकरणाच्या तपासात मोठा खुलासा झाला असून, देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल एक कोटी रूपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. ही रक्कम अधिकृत परवानगी असलेल्या आणि बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या अॅप्सच्या माध्यमातून प्राप्त झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या रकमेचा पुढील प्रवास नेमका कुठे झाला, कोणकोणाच्या खात्यात गेली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

जिल्हा 15. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी (३० जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कबाडी उपस्थित होते. अॅप घोटाळ्यात दर्शन, अभिषेक व इतर सेवांसाठी भाविकांकडून ५०० ते ५ हजार रूपयांपर्यंत रकमा आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. रक्कम तुलनेने लहान असल्याने कोणीही थेट फिर्याद दिली नव्हती, मात्र हजारो भाविकांकडून अशा प्रकारे रक्कम घेतली गेल्याने एकूण घोटाळ्याची रक्कम प्रचंड मोठी आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होत तपास सुरू केला.

देवस्थानकडून फक्त तीन अॅप्सना अधिकृत परवानगी देण्यात आली होती. परंतु तपासात चार अनधिकृत अॅप्स कार्यरत असल्याचे समोर आले असून, आणखी अॅप्स कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अॅप्स देशभरातील अन्य देवस्थानांनाही लिंक केले गेले असल्याची माहितीही उघड झाली आहे. या घोटाळ्यातील महत्त्वाचा मुद्दा या माध्यमातून सर्वात म्हणजे, देवस्थानच्या अधिकृत खात्यावर रक्कम जमा झाल्याचे पुरावें सध्या तरी उपलब्ध नाहीत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.