ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
रेल्वे

नेवासा – रेल्वे प्रशासनाने भक्तांना खास भेट दिली असून साईनगर शिर्डी आणि तिरुपती दरम्यान लवकरच एकूण १८ विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. या ट्रेनमुळे दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमध्ये थेट जोडणी होणार असून श्री साईबाबा आणि श्री वेंकटेश्वर स्वामींच्या दर्शनाची संधी भाविकांना सहज उपलब्ध होईल. या विशेष सेवांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

साईनगर शिर्डी – तिरुपती. साप्ताहिक विशेष ट्रेन (१८ सेवा), ट्रेन क्र. ०७६३८ (साप्ताहिक विशेष): ही गाडी दर सोमवारी ०४.०८.२०२५. ते २९.०९.२०२५ या कालावधीत साईनगर शिर्डी येथून सायंकाळी १९.३५ वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०१.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल. (एकूण ०९ सेवा), ट्रेन क्र. ०७६३७ (साप्ताहिक विशेष): परतीच्या प्रवासात ही गाडी .. दर रविवारी ०३-०८-२०२५—-ते २८.०९.२०२५ या कालावधीत तिरुपती येथून पहाटे ०४.०० वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता साईनगर शिर्डी येथे पोहोचेल. (एकूण ०९ सेवा)

रेल्वे

या विशेष रेल्वे गाड्या कोपरगाव, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद,जालना, सेलू, परभणी, गंगाखेळ, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भाळकी, बीदर, झहीराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, नलगोंडा, मिर्यालगुडा, नाडीकुडे, पिडुगुरल्ला, सत्तेनपल्ले, तेनाली, चिराला, ओंगोल, गुडूर आणि रेणिगुंटा या प्रमुख स्थानकांवर थांबतील. दरम्यान या रेल्वे सुरू होणार असल्याने साईभक्त आणि तिरुपती बालाजी भक्त यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.

newasa news online
रेल्वे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रेल्वे
रेल्वे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *