शनैश्वर

नेवासा – शनीशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानचा कंत्राटी कर्मचारी शुभम विजय शिंदे (वय २२) राः बेल्हेकरवाडी याने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी आत्महत्या केली. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे. शुभम शिंदे याचे आई-वडील हे शेतात कामाला गेले होते. घराच्या वरच्या पत्र्याच्या खोलीत त्याने गळफास घेतला. शेजारील मुलांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी ही माहिती परिसरातील नागरिकांना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. शुभमने बुधवारी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांपूर्वी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात दत्तात्रय आप्पासाहेब शिंदे (रा. बेल्हेकरवाडी)यांनी सोनई पोलीस ठाण्यात खबर दिली. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंदे याच्या मृतदेहाचे नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा बेल्हेकरवाडी येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिंगणापूर देवस्थानवर विविध घोटाळ्यांचे आरोप झाल्याने हे देवस्थान चर्चेत आहे.

शनैश्वर

यासंदर्भात चौकशीही सुरु आहे. ही चौकशी सुरु असतानाच गत सोमवारी सकाळी देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. त्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शुभम शिंदे या कंत्राटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, वडील, चुलता, चुलती, चुलतभाऊ असा मोठा परिवार आहे.

शुभम हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक होता. तसेच तो अविवाहित होता. शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये तो खासगी कंत्राटी कर्मचारी (वॉचमन) म्हणून कामाला होता. गोशाळा, मंदिर परिसर, भक्तनिवास आदी विभागात त्याने आलटून-पालटून काम केले. सध्या दहा दिवसांपासून तो कामावर जात नव्हता. आत्महत्येचे अद्याप ठोस कारण मिळाले नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब लबडे यांनी सांगितले.

शनैश्वर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनैश्वर
शनैश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनैश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!