नेवासा- राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून त्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा १ हजार ५०० रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस म्हणजे येत्या ८ ऑगस्ट रोजी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ. हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल शुक्रवारी एक्स या समाज माध्यमातून दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै २०२४ पासून केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीयोजने तील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपये दिले जातात. जुलै. महिन्याच्या. हप्त्याचं… वितरण करण्यासाठी २९८४ कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री महायुती सरकारनं माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचं वितरण करण्यासाठी २८२९० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी २९८४ कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली. आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.