ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
परसबाग

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांना शासनाकडुन विविध योजना द्वारे सुरू असताना सध्याला परसबाग तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे .

त्याच धर्तीवर नेवासा तालुक्यातील जायगुडे आखाडा येथे विविध बचत गटाच्या माध्यमातून परसबागेची आखणी करण्यात आली आहे.

यावेळी दीपक दरवडे, तसेच मनीषा तनपुरे यांनी बोलताना सांगितले की या परसबागेमध्ये पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय, बियाणाची लागवड करण्यात आली आहे .

परसबाग

मनीषा तनपुरे यांच्या माध्यमातून परस बागेचे फायदे सांगण्यात आले त्या बोलतांनी म्हणाल्या की परसबागेचे फायदे हे शरीरासाठी आरोग्यदायक आहेत परस बागेच्या माध्यमातून ताज्या पालेभाज्या तसेच सेंद्रिय पालेभाज्या आपल्याला रोजच्या रोज आहारामध्ये घेण्यासाठी मिळतात.

राठोड सर बोलताना म्हणाले की या परस बागेच्या माध्यमातून आपली आर्थिक बचत होते व आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते परसबागेच्या निर्मितीने महिलांना निरोगी व आपल्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार म्हणून परस बागेची महिलांनी निर्मिती करावी तसेच आपण त्यामध्ये निमाश्र, दशपर्णी अर्क, लसूण मिरची अर्क, यांची फवारणी केल्याने पूर्ण जैविक पद्धतीने फवारणी केल्याने आपल्याला रोगमुक्त भाजीपाला व जैविक पद्धतीचा भाजीपाला खाण्यास मिळेल व आपलं कुटुंबाचे स्वास्थ्य आबादीत राहील असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

परसबाग

या परसबाग निर्मितीच्या वेळी जायगुडे आखाडा येथील संसाधन व्यक्ती(C.R.P) मनीषा तनपुरे, ग्राम संघाचे अध्यक्ष तारा चव्हाण, बालाजी गटाच्या सदस्य मीना चव्हाण सचिव सुवर्णा चव्हाण, अंबिका गटाच्या सचिव कल्पना चव्हाण, साई श्रद्धा गटाचे अध्यक्ष शितल चव्हाण, बजरंग बली गटाचे अध्यक्ष विद्या चव्हाण , बालाजी गटाचे सदस्य,जयश्री चव्हाण , अंबिका गटाचे सदस्य,नंदा चव्हाण अश्विनी चव्हाण , पंचायत समितीचे पशुव्यवस्थापक दीपक दरवडे सर, बचत गटाचे संघटक राठोड सर, आधी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परसबाग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

परसबाग
परसबाग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

परसबाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *