नेवासा – नेवासा श्रीरामपूर राज्य’ मार्गावरील पाचेगाव फाट्याजवळ सानवी कृषी केंद्रात रविवार ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आता मध्ये प्रवेश करीत टेबलच्या कप्प्यातून पैसे चोरून नेले.
याबाबत नचिकेत दिलीप कुलकर्णी (वय ३२) रा. विवेकानंदनगर नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, ३ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजणचे सुमारास मी माझे दुकानचे ड्रॉव्हरमध्ये १२ हजार ७०० रुपये ठेवून मौ दुकान बंद करून घरी निघून गेलो.

त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी सकाळी८:१५ वाजणेचे सुमारास मी दुकानावर गेलो असता मला माझे दुकानचे अर्धवट शटर उघडे दिसले व शटरचे कोयंडे तुटलेले दिसले. दुकानातील काउंटरमधील ड्रॉव्हर उघडून पाहीले असता मी ठेवलेले पैसे मला दिसले नाही. कृषी सेवा केंद्रावर सीसी कॅमेरे असून त्या कॅमेऱ्यात अज्ञात चोरटे कैद झाले आहेत.
एक वर्षापूर्वी याच दुकानाच्या कामासाठी पत्रे व लोखंडी स्टील आणून टाकले होते. ते देखील चोरीला गेले होते. त्यात ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरी गेले होते. त्याचा तपास आज तंगायद लागला नाही तोच पुन्हा या दुकानात चोरी झाल्याने पोलिसांना चोरांनी एक प्रकारे आव्हान दिल्याचे बोलले जाते. या रस्त्यावर असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.