नेवासा – महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकतीच ३६७ उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील कुशल तरुणांना सरकारी सेवेमध्ये. प्रवेश करण्याचा मार्ग खुला झाला आहे. नाशिक विभागीय कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या या भरतीमध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती प्रामुख्याने आयटीआय आणि अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदविकाधारक उमेदवारांसाठी आहे. ही भरती प्रशिक्षणार्थी पदासाठी जाहीर करण्यात आली असून प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक येथे असणार आहे.

इच्छुक उमेदवारांचे वय १४ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. या रिक्त पदांसाठी होणार भरती ही भरती अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर आणि कारपेंटर या पदांसाठी होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

