नेवासा फाटा – त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व -विज्ञान महाविद्यालयात कौशल्य भारत विकास -या राष्ट्रीय अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण कोर्सेस विषयी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर डॉ. किशोर धनवटे यांनी विद्यार्थ्यांना या कोर्सेसचे उद्दिष्ट, अभ्यासक्रम रचना, प्रवेश प्रक्रीया तसेच विद्यार्थ्यांना होणारे प्रत्यक्ष फायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली.

डॉ. धनवटे यांनी कौशल्याधारित शिक्षणाची सध्याच्या रोजगार बाजारपेठेत असलेली गरज अधोरेखित केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांगदेवराव आरसुळे, कला शाखेचे प्रमुख प्रा. संतोष जावळे, प्रा. सोमनाथ खेडकर, प्रा. राहुल बोरुडे, प्रा. अनिकेत आरसुळे, उपप्राचार्य प्रा. निकिता बर्गे, प्रा. प्रवीण आवारे, प्रा. गोरख गुंड, प्रा. योगिता गायकवाड, प्रा. अश्विनी औटी, प्रा… अक्षय देवतरसे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले. शेवटी विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्राबद्दल समाधान व्यक्त करत, कोर्समध्ये नोंदणी करण्याबाबत उत्साह दर्शविला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

