नेवासा : सन २०२५ हे वर्ष संत ज्ञानेश्वर महाराजांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५० वे) असल्याने १४ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये पसायदान म्हणण्याचे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथे पसायदानातून विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे केलेली भक्तीपूर्ण प्रार्थना म्हटली जाणार आहे.
संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथे ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानातून जगात कल्याण, शांतता, समृद्धी आणि आनंद मिळावा याकरिता परमेश्वराकडे भक्तीपूर्ण प्रार्थना केली आहे. केवळ समाजच नाही, तर सर्व सृष्टीच्या कल्याणाची त्यांची प्रार्थना आहे. नेवासेतील प्रवरातीरी पैस खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली.

येत्या १५ ऑगस्टला गोकुळ अष्टमीला संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वरांची ७५० वी जयंती आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांत येत्या १४ ऑगस्टला पसायदान म्हणण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
नेवासा तालुक्यातील दोन दगडी शिळांना जगभर महत्त्व आहे. त्यातील पहिली शिळा आहे संत ज्ञानदेवांची. ती पैस खांब म्हणून ओळखली जाते. त्यांनी याच दगडी शिळेला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. भागवत सांप्रदायाची या स्थानावर अपार श्रद्धा आहे. नेवासा तालुक्यातील दुसरी दगडी शिळा आहे त्या स्थानाला शनिशिंगणापूर म्हणतात. याच शनिदेवाचे महात्म गेल्या काही वर्षांत जगभर वाढले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.