नेवासा – कृष्णाष्टमीच्या दिवशीच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या जयंती असते त्या निमित्त प्रति वर्ष प्रमाणे नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये भव्य पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यावर्ष महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील भव्य प्रमाणात ज्ञानेश्वर महाराज ७५० वी जयंती साजरी होत आहे त्यामुळे यावर्षी हा सोहळा देखील भव्य प्रमाणे साजरा होत आहे
या पारायण सोहळ्यामध्ये दररोज दिनांक९ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान पहाटे ४ ते ६ काकडा भजन व आरती, ७ ते ११ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायीक पारायण, दुपारी ४ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, सायं ७ ते ९ जाहिर हरी कीर्तन, १० ते ४ हरि जागर. असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
या सप्ताह मध्ये ह.भ.प.गु. मिराबाई महाराज मिरीकर,श्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापुरकर (दादा), आपेगांव ज्ञानेश्वर माऊली शिंदे अध्यापक, जोग महाराज संस्था, श्री क्षेत्र आळंदी देवाचीश्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली नामदास श्री संत नामदेव महाराज वंशज, श्री क्षेत्र पंढरपूर,श्री.ह.भ.प. बोगीराज महाराज गोसावी श्री संत एकनाथ महाराज वंशज, श्री क्षेत्र पैठण,ह.भ.प. उमेश महाराज दशस्थे श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्यासह १६ ऑगस्ट ला सकाळी १० ते १२ कृष्ण जयंती निमिताने श्री.ह.भ.प. वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के काल्याचे किर्तन होईल.

तर ह.भ.प. आदिनाथ महाराज भोगे खरवंडी,ह.भ.प. ज्ञानदास डॉ. विजयकुमार फड (IAS) संभाजीनगर.ह.भ.प. कृष्णा महाराज हारदे माळेवाडी ह.भ.प. राम महाराज खरवंडीकर खरवंडी,ह.भ.प. भगवानजी महाराज जंगले (शास्त्री)रामकृष्ण आश्रम, गोणेगांव-चौफुला
श्री.विठ्ठल आणि ह.भ.प. गुरूवर्य स्वामी भारतानंदगिरीजी महाराज गुरूकुल लाडेवडगांव केज यांचे दररोज दुपारी प्रवचने होणार आहेत
श्री.ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड हे सप्ताहाला सदिच्छा भेट देणार आहेत
याशिवाय यावर्षी महत्त्वाचे बुधवार दि. १३/८/२०२५ रोजी दुपारी १२ ते २ स्वरमाधुरी प्रस्तुत भक्तीरंनेवासाग सादरकत्यां माधुरीताई नितीन कुलकर्णी, यांचे कीर्तन होणार असून
शुक्रवार दि. १५/८/२०२५ रोजी दुपारी ५ ते ७ भव्य मिरवणूक सोहळा होणार आहे या ग्रंथ मिरवणुकीमध्ये नेवासकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पारायण सप्ताह मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे वेदांतचर्य देविदास महाराज म्हस्के संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग आणि विश्वस्त मंडळाने केले आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

