नेवासा- नेवासा नगरपंचायतीची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील कर वसुली करण्याकामी पाणीपट्टी कर मागणी तसेच बिल वाटप करण्याचे काम नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मार्फत सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. कर मागणी बिनाबाबत नगरपंचायत हद्दीतील सामाजिक संघटनेमार्फत कर मागणी बिले वाढीव तथा चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नेवासा नगरपंचायत हद्दीतील सर्व मालमत्तांनाधारकांनी कर मागणी बिलाबाबत काही तक्रार तथा तांत्रिक अडचण असल्यास कर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी केले.

नेवासा नगरपंचायतीच्या संबंधित आलेल्या बिलाबाबतचे निराकरण तात्काळ करण्यात येणार असून नेवासा नगरपंचायतीचा कर भरणा नागरिकांनी वेळेत करावा, असे आवाहन मुख्याधिकारी लांडगे यांनी केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.