अहिल्यानगर – शहीद डॉ.नरेंद्र डाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपूर्ण जिल्हाभर स्थापन करणार असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त पोलिस अधिकारी बाबासाहेब बुधवंत यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक रविवार दि.१२ ऑगस्ट रोजी श्री.बुधवंत यांच्या
अहिल्यानगर येथील निवासस्थानी पार पडली. जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड,जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा व देवदत्त साळवे, जिल्हा प्रसिद्धि व सोशल मीडिया कार्यवाह सुखदेव फुलारी, कारभारी गायकवाड, विनायक ताकपेरे, अड.राहुल बुधवंत, सुनिता पवार आदि यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत अंनिसच्या स्थापनेला ३६ वर्षे पूर्ण झाल्याने जिल्हाभर नवीन शाखा स्थापन करणे,आहे त्या शाखांना भेटी देणे, शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी २०ऑगस्ट रोजी कार्यक्रमांचे आयोजन करणे, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मासिकाचे सभासद वाढवणे या विषयांवर चर्चा झाली.
विनायक सापा यांनी प्रास्ताविक केले.सुखदेव फुलारी यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.