नेवासा- नेवासा पोलीस ठाण्यात नव्यानेच हजर झालेले पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी चोरीस गेलेल्या एका मोटारसायकलचा तपास अवघ्या २४ तासाच्या आतमध्ये लावून नेवासकरांना आपल्या कर्तव्याची ‘झलक’ दाखविल्यामुळे पो.नि. पाटील यांच्या तपास कर्तबगारीचे जनतेतून मोठे कौतुक केले जात आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, नेवासा फाटा येथील विकास लक्ष्मण रक्ताटे यांची हिरो कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एम.एच.१७ बी.जी.४५७८) ही मोटारसायकल रक्ताटे यांच्या रहात्या घरासमोरुन दोन दिवसांपुर्वी पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरीस गेलेली होती.

ही मोटारसायकल चोरीस गेल्यामुळे त्यांनी त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास रक्ताटे यांना या घटनेची माहीती दिली असता त्यांनी या घटनेची माहीती नेवासा येथील जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ या घटनेची खबर समक्ष भेट घेवून नेवासा पोलीस ठाण्यात नुकताच पदभार स्विकारलेल्या पोलीस निरिक्षक महेश पाटील यांना सांगितली असता या मोटारसायकल चोरीची गंभीर दखल घेत त्यांनी चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा तपास करण्याचे फर्मान आपल्या पोलीस ठाण्यातील हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, अमोल साळवे, सनी गंगावणे, गणेश जाधव यांना सांगून पोलीसांनी युद्धपातळीवर तपास केला असता पोलीसांना चोरीस गेलेली मोटारसायकल सुरेगांव रस्त्यावर बेवारस आढळून आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.


