ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
वंदे भारत

विद्यार्थी, व्यापारी, पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा – खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे

नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन कोपरगाव स्थानकावर रात्री ०८.०० वाजता झाले. गाडीला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. या सेवेमुळे विद्यार्थी, व्यापारी व पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असून, वेळ व खर्च वाचणार असून आपल्या स्थानिक नागरिकांना देखील मोठा फायदा होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बेंगळुरू–बेलगावी, अमृतसर–श्री माता वैष्णो देवी कटरा व गाडी क्रमांक ०१००१ नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस या तीन गाड्यांचा ध्वज फडकावून शुभारंभ करण्यात आला.

वंदे भारत

नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे कोपरगाव येथे आगमन झाल्यानंतर झालेल्या स्वागत समारंभास खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे, आमदार श्री.आशुतोष काळे, मा.आ.सौ.स्नेहलता ताई कोल्हे, राजाभाऊ झावरे, संदीप वर्पे, मुकुंद जी सिनगर , सर्व सहकारी व रेल्वे विभागाचे अधिकारी मान्यवर उपस्थित होते.
परदेशातील रेल्वेच्या तुलनेत वंदे भारत सेवा सर्व बाबतीत उत्कृष्ट आहे. ही सेवा देशभर लोकप्रिय झाली आहे. नागपूर–पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे आहे.
या कार्यक्रमात रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

वंदे भारत
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वंदे भारत
वंदे भारत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वंदे भारत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *