सलाबतपुर – नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये सन 2003-2004 या वर्षी शिकत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 10 रोजी सकाळी दहा वाजता या स्नेहमेळ्याचे आयोजन केले होते.
या स्नेहमेळ्याचे आयोजक सलाबतपुर रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असलम पटेल यांनी केली होते या स्नेहमेळ्याचे औचित्य साधून 2003-2004 साली शिकत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत हास्नेह मेळावा आनंदात संपन्न केला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावरती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यादव सर हे होते तसेच व्यासपीठावरती कर्डक सर ,घाडगे सर,भोसले सर ,खाटीक सर ,संदीप बनकर सर, कराळे सर, फिलिप पवार, जपे मामा, असीफ पटेल फोटोग्राफर सागर शिंदे हे माजी शिक्षक उपस्थित होते.

यावेळी स्नेहमेळा प्रसंगी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तद नंतर मान्यवराचे स्वागत करण्यात आले तसेच अध्यक्षांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
तसेच माझे विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील गोड अनुभवाला उजाळा दिला तसेच शालेय जीवनामधील घडलेल्या सर्व गोष्टींना हसत खेळत उजाळा दिला.
या कार्यक्रम प्रसंगी गणेश शिंदे,चांगदेव पेहरे ,गणेश कोहक, विकास कपिले, कैलास दळे, अभिजीत कुऱ्हाडे,निखिल दिवाकर, संकेत चुत्तर, गोरख विधाटे, मनोज देशमुख ,विजय मोकळ, राहुल देशपांडे ,आसिफ कादरी, महेश वडागळे ,असलम पटेल ,रवी काटे ,विजय बर्वे, हरिभाऊ विधाटे, सोमनाथ जगधने ,आरिफ शेख, साईनाथ वाघुले ,गोरख शिरसाट, बिलाल पठाण , रमेश कर्डक, समीर सय्यद, सत्यभामा भगत, निर्मला निकम, समिंद्रा नवले, विद्या तांगडे, अनिता पवार ,अर्चना बर्वे, अश्विनी साबळे , प्रमिला बर्वे, वर्षा साळुंके ,सुरेखा भगत ,भारती भगत, रेणुका गादे,वंदना काळे, योगिता पिसे ,सोनाली खंदारे ,रेखा तांबे,अर्चना निकम, मीना नजन, वच्छला काळे,आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी कर्डक सर बोलतांना म्हणाले कि रयत शिक्षण संस्था ही उत्कृष्ट शिक्षण देणारी संस्था असून पालकांनी आपला मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये टाकली तर त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही हे रयत शिक्षण संस्थेचे वैशिष्ट्य असून तुम्ही भविष्यकाळामध्ये आपले मुलं-मुली उच्च शिक्षण कसे दिसतील व उच्च पदावर कसे जातील याचा विचार करणे गरजेचे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यानंतर मनोज गुरगुरल्याशिवाय राहत नाही असे मनोगतामधून माजी विद्यार्थ्यांना कर्डक सरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी यादव सर बोलतांना म्हणाले की तुम्ही सुंदर स्नेह मेळाव्याचे आयोजन केले सगळ्यांना एकमेकांना भेटीचा योग जुळवून आणला त्या वेळेच्या कळव आताच्या काळामध्ये या शाळेमध्ये खूप बदल झाला असून त्यावेळी शिक्षकाचे प्रेम आज आपण पुन्हा एकदा दाखवून दिले आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला एवढ्या वर्षातून भेटलो त्याच्या मनस्वी आनंद मला होत असल्याचे यादव सरांनी बोलताना सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.