नेवासा-एक राखी एक भाव सैनिक भाई के नाम
देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांप्रती रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रेम कृतज्ञता व स्नेहभाव व्यक्त करण्यासाठी ‘ एक राखी एक भाव सैनिक भाई के नाम या उपक्रमांतर्गत कै सौ सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालय नेवासा येथील विद्यार्थिनींनी आपल्या हाताने आकर्षक राख्या तयार करून त्यासोबत सैनिक बांधवांसाठी प्रेमळ शुभेच्छा संदेश भावनिक पत्र हे सर्व भारतीय लष्कराच्या सीमेवर पाठवण्यात आल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्या मध्ये देशप्रेम सामाजिक बांधिलकी व राष्ट्रभावना अधिक सशक्त झाली आहे या उपक्रमासाठी श्रीम गोरे सुजाता यांचे मार्गदर्शन लाभले.

प्राचार्या श्रीम पारखे सुरेखा यांनी शाळेतील विद्यार्थिनींचे कौतुक करत सांगितले की ही राखी फक्त एक धागा नसून ती सैनिकां प्रतीच्या आपुलकीची प्रेमाची व विश्वासाची दोरी आहे विद्यार्थिनी नी दाखवलेली ही भावना देश भक्तीचा खरा अर्थ सांगणारी आहे
या उपक्रमाने संपूर्ण परिसरात एक सकारात्मक संदेश दिला आहे की लहानशा राखीतूनही आपण सैनिकांचे मनोबल वाढवू शकतो या उपक्रमामुळे विद्यार्थीनीनी केवळ राखी पाठवली नाही तर त्यांच्या मनातील सैनिकांप्रती असलेला आदर व प्रेम शब्दांतून व कृतीतून व्यक्त केला या उपक्रमांसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व कन्या विद्यालयाने दिलेल्या या भावनिक सलामीचे सर्वत्र कौतुक होत आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.