ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पत्रकार

सोनई – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व सत्य पोलीस टाइम्सचे संपादक श्री डी टी आंबेगावे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे. सन २०१८ ते २०२५ या कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन मुंबईच्या वतीने गौरविण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ भारत सरकार स्वतंत्र संचालक राज्यमंत्री दर्जा, मिनिस्ट्री ऑफ स्टिलचे नामदार भरत नाना पाटील, आमदार विक्रांत दादा पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे बापू, महेश म्हात्रे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष जयप्रकाश पवार, युवा अध्यक्ष नितीन शिंदे, शिवसेनेच्या महिला नेत्या रंजनाताई शिंत्रे, संजय सावंत, पत्रकार प्रकाश शिर्के, अमोल वाटवे, गौराज जाधव, एकनाथ तांबवेकर, रिंकू खरे आदी मान्यवर उपस्थित होते. डी टी आंबेगावे विविध क्षेत्रांत कार्य करीत आहेत.

पत्रकार

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी व मजुरांसाठी लढा, कोविड काळात, गोर गरीब कुटुंबांना अन्नधान्य व कपड्यांचे वाटप, महापुरुषांच्या जयंतीनिमित जागर, अपघातग्रस्त पत्रकारांस मदत, पत्रकारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत, वृक्षारोपण, अनाथ मुलांना पुस्तकं व खाऊ वाटप, वृद्धाश्रमातील आजी आजोबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत, पत्रकार व नागरिकांसाठी पत्रकार शिबिराचे आयोजन, कोविड काळात ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस बांधवांना मास्क व नाश्ता, पत्रकारांचा अभ्यास दौरा, दिव्यांग बांधवांना छत्री वाटप, वारकऱ्यांना प्रसाद वाटप, अपघातग्रस्त व्यक्तीस मदत, रुग्णांना फळं वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, विद्यार्थ्यांसाठी मोफत व्याख्यान, पत्रकारावर होणारे हल्ले व खोटे गुन्हे थांबवणे, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण, कोविड काळात मास्कचे वाटप,

पत्रकार

रक्तदान शिबिराचे आयोजन, कोविड काळात कुटुंबांना घरपोच किराणा, पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयाकडे पाठपुरावा, कोविड काळात भिंतीवर पेंटिंग करून जनजागृती, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पत्रकारिता आदी क्षेत्रांत डी टी आंबेगावे उल्लेखनीय कार्य करीत आहेत. सदर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. डी टी आंबेगावे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पत्रकार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पत्रकार
पत्रकार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पत्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *