नेवासा – आज दिनांक 12 ऑगस्ट 25 रोजी अप्पर जिलाधिकारी तथा कार्यकारी संचालक मानव संसाधन विभाग,
महा राज्य विद्युत पारेषण कंपनी यांचा आज जन्मदिन आहे.
जिल्हाधिकारी मॅडम यांनी सामाजिक बांधिलकी जपत आत्ता पर्यत अनेक उपक्रम राबविले आहे.
मुक्या प्राण्यांचे संगोपन, अपघाती प्राण्यांना रुग्ण वाहिका उपलब्ध करून त्यांच्यावर उपचार करून सांभाळ करण्यासाठी त्यांची SACH – Shivpooja Animal Care House पुणे ही संस्था सन 2022 पासून अविरत सेवेत आहे.
शिवपूजा फौंडेशन मार्फत मुक्या प्राण्यासाठी निवारा स्थानाची देखील सोय करण्यात आली आहे..

आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच ‘एक पेड मा के नाम’ या त्यांच्या स्तुत्य संकल्पनेनुसार शरणपूर वृद्धाश्रम येथे वृक्षारोपण करून, नंतर या आश्रमातील वृद्ध व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले..
त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कुल, म्हाळस पिंपळगाव ता नेवासा जिल्हा अहमदनगर या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी वर्गास शालेय वस्तू भेट देण्यात आल्या..
आनंद गोशाळा, खडका फाटा, नेवासा येथे असलेल्या 70 देशी गायीना चाऱ्याचे वाटप करण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

