छत्रपती राजर्षी शाहू

नेवासा | सचिन कुरुंद उत्कृष्ट शाखाव्यवस्थापक नामांकणात उल्लेखनीय काम केल्याबद्दल बँकेच्या 46 शाखामधून प्रथम क्रमांक मुकिंदपूर (नेवासा फाटा) शाखेचे शाखाव्यवस्थापक श्री. विजय लिंबाजी चव्हाण यांचा विशेष सत्कार बीड जिल्ह्यातील तसेच संपुर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली नामांकीत सहकारी बैंक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि., बीड बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १० ऑगस्ट (रविवार) रोजी “आशिर्वाद लॉन्स”, बार्शी रोड, बीड येथे खेळी-मेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेचे दिपप्रज्वलन बँकेचे अध्यक्ष, मा. इंजि. अजय पाटील, उपाध्यक्ष प्रा. नारायण मस्के व सर्व संचालकाच्या हस्ते करण्यात आले. या सभेस बँकेचे अध्यक्ष मा. इंजि. अजय अर्जुनराव पाटील यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले वार्षिक सर्व साधारण सभेच्या विषय सुची प्रमाणे प्रत्येक विषयास बहुमताने मंजुरी दिल्या बद्दल सर्वांचे धन्यवाद मानले.

छत्रपती राजर्षी शाहू

ज्या सभासदांचे बँकेत खाते/मोबाईल नंबर नाही त्यांनी खाते उघडणे व मोबाईल नंबर देण्याचे आव्हान केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की यापुढे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नविन नियमानुसार ज्या सभासदांनी लाभांश उचलला नाही अशा सभासदांचा लाभांश खात्यात वर्ग होणार आहे. त्यामुळे सभासदांनी आपले बँकेत खाते उघडून घ्यावे. व लाभांशाची रक्कम घेण्याचे विनंती केली आहे. प्रत्येक खात्यास खातेदाराचा मोबाईल नंबर दयावा कुटूंबातील सदस्यांचा देवू नये, त्यामुळे बँकेकडून येणारे प्रत्येक संदेश अवगत होणार नाहीत. या संबंधी माहिती दिली. खाते नियमीत ठेवणे महत्वाचे आहे, जेणे करून आपले खाते बंद होणार नाही.

३१ मार्च २०२५ अखेर बँकेच्या ठेवी रु.१४८४ कोटी, कर्ज रु.८७० कोटी व नफा करपुर्व रु.१४.८७ कोटी झाला असुन हे आपल्या सर्व सभासद, ग्राहक, खातेदार, कर्जदार यांच्या सहकार्याने पुर्ण झालेले आहे. त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. जनसामान्यांना आर्थिक आधार या बँकेत विश्वासा सोबत पैसाही वाढला आहे.

छत्रपती राजर्षी शाहू

कष्टाने मिळवलेला पैसा साठवायला जागाही तेवढीच विश्वासाची लागते. आनंदाची बाब म्हणजे या वर्षीही बँकेस मराठवाडा विभागातून रु.१००० कोटी ते रु.१५०० कोटी ठेवी असणाऱ्या बँकामधून असोसिएशन तर्फे पद्मभुषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बैंक हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यावर्षीही बँकेच्या सभासदास १०% लाभांश जाहीर केला. बँकेचे जेष्ठ संचालक श्री. सत्यनारायण लोहिया यांनी तंत्रज्ञानाच्या आधारावर बँकेने सेवा सुधारलेल्या असुन अधिक चांगली सेवा कशी देता येईल याचा संचालक मंडळ सातत्याने प्रयत्न करीत आहे. बँक सातत्याने शाखा निहाय ग्राहक मेळावा आयोजीत करून जास्तीत जास्त सभासद ग्राहक यांना बँकेची माहिती अवगत केली जात आहे. बँकेने पारदर्शक्ता ठेवली आहे. त्यामुळे बँकेची विश्वासहर्ता वाढली आहे. आपण केलेले आजपर्यंतचे सहकार्य यापुढे ठेवण्याची विनंती केली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवार बी.ई. यांनी वार्षिक सर्व साधारण कर सभेत विषय सुचिनिहाय सभे समोर मांडले. सभेस सभासदाची उपस्थिती लक्षनीय होती. या सभेत बँकेत वर्षभरात उत्कृष्ट काम करणारे शाखा व्यवस्थापक, सहा. शाखा व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी, सेवक यांना प्रमाणपत्र देवून रक्षा सन्मानित केले.

छत्रपती राजर्षी शाहू


सन 2024 25 या आर्थिक वर्षात पुणे विभागाचे घवघवीत यश बँकेतर्फे 1) उत्कृष्ट शाखा नामांकणात क्रमांक तीन काशिमिरा ठाणे याचे शाखा व्यवस्थापक श्री संतोष जठाळ साहेब (2) उत्कृष्ट शाखाव्यवस्थापक नामांकणात उल्लेखनीय काम केल्याबद्दल बँकेच्या 46 शाखामधून प्रथम क्रमांक मुकिंदपूर (नेवासा फाटा) शाखेचे शाखाव्यवस्थापक श्री. विजय लिंबाजी चव्हाण
(3) उत्कृष्ट सहाय्यक शाखाव्यवस्थापक या नामांकणात श्री विष्णू बोटवे यांना प्रथम (4) वाघोली शाखेचे सेवक नामांकणात श्री.विशाल शिंदे यांना प्रथम वार्षिक क्रमांक मिळाल्याबद्दल सर्वांचे सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. या वर्षी बँकेचे अध्यक्ष इंजि. अजय पाटील यांनी बँकेतील शाखेतील सहा. शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी यांचे वर्ष भरात बँकेतील कामकाजावर ज्ञान आधारीत ऑनलाईन परिक्षेत सर्वात जास्त गुण घेणाऱ्या कर्मचारी यांना प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक काढून रोख बक्षीस व प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. शेवटी बँकेचे संचालक अॅड. शहाजीराव जगताप साहेब यांनी आभार प्रदर्शन केले.

छत्रपती राजर्षी शाहू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

छत्रपती राजर्षी शाहू
छत्रपती राजर्षी शाहू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

छत्रपती राजर्षी शाहू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!