नेवासा-कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून 2023-24 च्या गळीत हंगामातील ऊसाचे पैसे न मिळाल्याने आणि वारंवार पाठपुरावा करूनही कारखान्याने केवळ आश्वासन देऊन फसवल्यामुळे याविरोधात १५ ऑगस्ट २०२५ पासून नेवासा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केल असून त्याला कूकडीच्या उसाचे पैसे न मिळालेले अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे
दिघी येथील शेतकरी संजय नागोडे, लक्ष्मीबाई नागोडे आणि मच्छीद्र गवळी यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याकडून ₹२८०० प्रति टन दर कबूल करूनही त्यांचा ऊस बिल दोन वर्षांपासून थकवण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांना पेमेंट दिले गेले, मात्र अनेक शेतकऱ्यांचे थकलेल्या लाखो रुपयाच्या पैशाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ७जुलै २०२५ रोजी उपोषणासाठी अर्ज केला होता, त्यावरआहे. काही शेतकऱ्यांना पेमेंट दिले गेले, मात्र अनेक शेतकऱ्यांचे थकलेल्या लाखो रुपयाच्या पैशाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ७जुलै २०२५ रोजी उपोषणासाठी अर्ज केला होता, त्यावर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी ४ ऑगस्ट रोजी पैसे देण्याचे आश्वासन दिले.

मात्र त्यानंतरही काहीही पेमेंट न झाल्याने आता ही टोकाची भूमिका घेता या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले
या उपोषणाला शेतकरी संघटनेच्या राज्य उपध्यक्ष एडवोकेट अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिलऔताडे, तालुकाध्यक्ष अशोकराव काळे, बाबासाहेब नागोडे, राहुल कुलकर्णी, आणि आदर्श शिक्षक टिल्लू गव्हाणे यांनी पाठिंबा दिला आहे तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय बनसोडे यांनी देखील पाठिंबा जाहीर केला
तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा हजार टन कुकडी साखर कारखान्याला गेला होता गेले दोन वर्ष झाल या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सुरू झालेले उपोषनाला सलाबतपुर, गळनिंब गोगलगाव, दिघी, जळका खडका या सह तालुक्यातील शेतकऱ्यांनी भर पावसात उपस्थित राहून पाठिंबा दिला व निवेदाना वर सह्या केलेले आहेत


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.