नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल मध्ये देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आज शुक्रवार दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सदस्या ॲड. अलकाताई जंगले होत्या तर विचार मंचावर सुनीलजी वाघ, किशोर जराड,प्राचार्य रावसाहेब चौधरी, प्राचार्या सुरेखा पारखे, पर्यवेक्षिका सुनिता दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शासकीय नियमाप्रमाणे राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले. एनसीसी पथकाने संचलन केले.

देशभक्तीपर गीतांच्या तालावर सामुदायिक कवायत करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. रांगोळीतील ‘एक पेड माँ के नाम’,’हर घर तिरंगा’हे संदेश लक्षवेधक होते. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी सुनिल वाघ, प्राचार्या सुरेखा पारखे, ॲड. अलकाताई जंगले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.सूत्रसंचालन रविंद्र गारुळे यांनी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

