कुकाणा – आज दिनांक 15 ऑगस्ट म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिवस किड्स किंग्डम अकॅडमी कुकाना येथे अतिशय आनंदाने व उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाकरिता शाळेमध्ये कुकाणा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल ढमाले सर उपस्थित होते तसेच नृत्य शिक्षिका प्रांजल मुनोत मॅडम तसेच शिक्षिका राऊत मॅडम उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्ती वरच्या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य सादर केले तसेच चिमुकल्यानी भाषण करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या पोलीस कॉन्स्टेबल ढमाले सर यांनी मुलांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी धीरज गुंदेचा या पालकांनी मुलांना केळी व चॉकलेटचा खाऊ दिला या कार्यक्रमासाठी संस्थेच्या प्राचार्या सौ कीर्ती बंग मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रतिमा कदम मॅडम यांनी केले तसेच शिक्षिका पायल लिंगायत मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.