जिल्हा क्रीडा परिषद, महानगरपालिका शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन आणि इन्फिनिटी स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा रायफल शूटिंग स्पर्धेत सौंदाळा गावची सुपुत्री कु. प्रणल शरद अरगडे हिने १९ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला.
अहिल्यानगर जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. छबुराव काळे यांच्या हस्ते तिला रौप्यपदक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खुरंगे आणि महापालिका क्रीडा अधिकारी श्री. व्हिन्सेंट फिलिप उपस्थित होते.
विभागीय स्तरावर होणाऱ्या रायफल शूटिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून, विविध क्षेत्रांतून प्रणलचे अभिनंदन होत आहे.
महावितरण कंपनी, अहिल्यानगर येथे कार्यरत असलेले श्री. शरद अरगडे यांची ती कन्या आहे.
या यशासाठी तिला ऋषिकेश सर, भापकर सर आणि म्हस्के सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.