नेवासा – कुकडी सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ सालातील थकीत उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास विलंब केल्यामुळे, नेवासा तहसील कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थेट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आमरण उपोषण सुरू केले. देशाच्या अन्नदाता शेतकऱ्याला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागतो, हे दुर्दैव असल्याचे यावेळी बोलताना अनेक शेतकऱ्यांनी नमूद केले.
शेतकरी देशाचा पोशिंदा असूनही उपोषणास भाग पडतोय
भारत हा कृषिप्रधान देश असून, अन्नपुरवठ्याचा कणा असलेल्या शेतकऱ्यांनाच त्यांच्या हक्काच्या उसाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. कुकडी साखर कारखान्याने २०२३-२४ या वर्षी शेतकऱ्यांकडून ऊस घेतला, मात्र २०२५ उजाडूनही अद्याप त्यांच्या खात्यावर एकही रुपया वर्ग झालेला नाही.

संजय नागवडे यांचा आरोप — “शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकलं”
उपोषणकर्ते शेतकरी संजय नागवडे बोलताना म्हणाले, “आम्ही काबाडकष्ट करून ऊस पिकवला आणि कुकडी साखर कारखान्याला दिला. परंतु आज २०२५ सुरू होऊनही आमच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे शेतीसाठी खते, बियाणे घेण्यासाठीही पैसे नाहीत. आमच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले असून, या परिस्थितीत आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो आहोत.”
शेतकऱ्यांची हलाखीची अवस्था
ते पुढे म्हणाले की, “सध्या आमच्या कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. घरखर्च चालवणेही कठीण झाले आहे. बँका कर्जाची मागणी करत आहेत, पण आमच्याकडे काहीच उरलेले नाही. यामुळे उपोषणाशिवाय पर्याय राहिलेला नाही.”
शासनाकडे निवेदन
या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली की, कुकडी सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ सालातील थकीत उसाचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही दिला.

उपोषणास उपस्थित शेतकरी व नेते
या आमरण उपोषणात संजय नागवडे, मच्छिंद्र गवळी, अनिल खंडागळे, लक्ष्मण चावरे, अशोक नागवडे, बाबासाहेब नागवडे, शिवाजी नागवडे, पांडुरंग सांबरे, चंद्रकांत गवळी, अशोक खंडागळे, अरुण नागवडे, हुसेन पठाण, शंकर वाघ, रामभाऊ निकम, उमेश निकम, नंदकुमार निकम, अहमद पठाण, बबाबाई पिसे, हरिभाऊ निकम, रिजवान पठाण, इरशाद शेख, दादासाहेब चिमणी, अंजली शिंदे, संदीप घाडगे, सचिन तांबे, काशीबाई तांबे, पोपट तांबे, विठ्ठल निकम, गणेश शेडाळे, संभाजी शिंदे, प्रशांत वाघ, अशोक हरसुळे, भागचं दळे, रमेश दळे, अनिल पिसे, विठ्ठल नाईक, सुभाष नाईक इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी संघटनांचा पाठिंबा
या आंदोलनास शेतकरी संघटनेचे अनिल औताडे, अॅड. अजितराव काळे, अशोकराव काळे, बाबासाहेब नागवडे, तोवर आप्पा, रोहित कुलकर्णी, दत्तात्रय निकम, टिल्लू दादा गव्हाणे, शिवाजी निकम, माणिकराव जनार्दन गवळी, संजय बनसोडे यांच्यासह अनेक नेत्यांनी पाठिंबा दर्शवला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.