नेवासा — नेवासा तालुक्यातील रांजणगाव (देवी) येथे दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष महिला ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या विशेष ग्रामसभेमध्ये महिलांनी विविध विषयांवर सखोल चर्चा करून महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर केले.
ग्रामसभेत मंजूर ठराव पुढीलप्रमाणे:
- पंचायत समिती निर्देशानुसार पी.डी.आय. – २ ची माहिती वाचून दाखवणे व प्रमाणिकरण करणे
- टीबी मुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबविणे
- बालविवाह मुक्त गाव संकल्प घेऊन त्यानुसार गावात अभियान राबविणे
- सन २०२६-२७ सालासाठी ग्रामविकास आराखडा तयार करणे
- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत २०२५-२६ पुरवणी आराखडा तयार करणे
- “आपले सरकार” योजना अंतर्गत सेवा आणि लाभ यांचा प्रचार व प्रसार करणे

या सर्व ठरावांवर महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवत निर्णय घेतले.
उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती कल्पना लोखंडे होत्या. त्यांच्यासोबत ग्रामसेवक रमेश गायके, सी.आर.पी. संगीता वाळुंजकर, ग्रामपंचायत ऑपरेटर पूजा वाकचौरे, ग्रामपंचायत क्लार्क निवृत्ती चौधरी व सुखदेव चौधरी, तसेच बहुजन वंचित आघाडीचे उपाध्यक्ष बाबासाहेब अल्हाट, ग्राम संघाच्या अध्यक्षा अश्विनी चौधरी, सचिव काजल अल्हाट, अलका पाठक, आसराबाई लोखंडे, सुनीता चौधरी, इंदुबाई चौधरी, वच्छालाबाई पुंड, विमल जावळे, रेणुका चव्हाण, अंगणवाडी सेविका इंदू कांबळे, नजन मॅडम, शांताबाई पेहेरे आणि गावातील विविध गटांतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.