नेवासे शहर ता.१७ – नेवासे येथील होमगार्ड कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी नेवासे होमगार्डचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी काढले.
प्रारंभी होमगार्ड कार्यालयाच्यावतीने माजी समादेशक बाळासाहेब देवखिळे व पलटण नायक अशोकराव टेमकर यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.
पोलिस पाटील दिलीप गायकवाड, पलटन नायक दादासाहेब कनगरे, राजेंद्र बोरुडे, अशोकराव चव्हाण
यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी होमगार्डचे प्रसिद्धी प्रमुख सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले पलटण नायक श्रीकांत ससे यांनी संचलन करून मानवंदना दिली.

यावेळी डॉ करणसिंह घुले, शिवसेनेचे श्रीकांत भागवत ,डॉ अर्जुन शिंदे, लिपिक अल्ताफ शेख, गणेश लोहकरे, गफ्फार शेख, दिलीप पेचे, महिला होमगार्ड रुख्मिनी सरोदे, मनीषा खादे, सुनंदा कवडे, रंजना रासकर उपस्थित होते.
गृहरक्षक दलात डॉक्टर, वकील, इंजीनियर, पत्रकार हि सर्व मंडळी देशसेवा करण्याच्या हेतुने निष्काम सेवा करत असतात त्यामुळे पोलीस दलाला देखील यासर्वाची मोठी मदत होते त्यामुळे गृहरक्षक दलाचे कार्य कौतुकास्पद आहे असे हि पाटील म्हणाले
यावेळी मोहन गायकवाड यांनी उपस्थित होमगार्ड व मान्यवारांचे आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.