मुकिंदपूर, नेवासा फाटा : आत्मदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचे एकत्रित लोकार्पण तसेच नवीन डायलिसिस युनिटचा आत्मदीप लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
हा लोकार्पण सोहळा देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज (देवगड संस्थान) आणि डॉ. ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. एस. एस. दिपक (चेअरमन, साईदीप सह्याद्री हॉस्पिटल) यांनी भूषविले.

मान्यवर उपस्थित :
- मा. श्री. प्रभाकर काका शिंदे (संस्थापक, पंचगंगा उद्योग समूह)
- मा. श्री. कडूभाऊ काळे (संस्थापक, नागेबाबा उद्योग समूह)
- मा. श्री. काशिनाथ नवले (संचालक)
- श्री. ऋषिकेश शेटे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप)
- श्री. माऊली पेचे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप)
- श्री. प्रताप चिंधे (तालुकाध्यक्ष, भाजप)
- सौ. रत्नमाला ताई लंघे पाटील
- मा. श्री. सतीषदादा निपुंगे (सरपंच)
तसेच विविध मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.