ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
रस्ता

नेवासा – नेवासा तालुक्यातील देडगांव येथील एका शेतकऱ्याने जाणे – येणेसाठी तसेच शेतीची मशागत करण्यासाठी रस्ता मिळण्याकामी नेवासा तहसिलदार कार्यालयाकडे अर्ज सादर करुन रस्ता मिळण्याच्या मागणीसाठी गावातील कामगार तलाठी कार्यालयासमोर संतोष भाऊराव टांगळ या शेतकऱ्यांने एक महिण्यापुर्वी उपोषण केलेले होते माञ नेवासा तहसिलदार कार्यालयाकडून या शेतकऱ्याला रस्ता देण्याचे लेखी आश्वासन देवून उपोषण मागे घेण्यास भाग पाडलेले होते माञ पुन्हा एक महिना उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे पुन्हा या शेतकऱ्याने देडगांव येथील कामगार तलाठी कार्यालयासमोर मंगळवार (दि.१९) रोजीपासून अमरण उपोषण सुरु केलेले असून आजचा दुसरा दिवस उलटूनही या शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाने अद्याप दुर्लक्ष केल्यामुळे आपण आता माघार घेणारच नसून माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर ठेवून रस्त्याची मागणी मान्य करुन रस्ता खुला होत नाही? तो पर्यंत अमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी उपोषणकर्ते शेतकरी संतोष टांगळ यांनी दिला.

रस्ता


याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,मौजे देडगांव (ता.नेवासा) येथील शेत जमीन गट नंबर – ५८४ /१ (अ) तसेच गट नं.५८३/१ मध्ये जाणे – येणे वहीवाट आणि शेतीची महेनत मशागत करण्यासाठी रस्ता मिळण्याबाबत संतोष भाऊराव टांगळ (वय ३८ वर्षे) रा.देडगांव,ता.नेवासा जि.अहिल्यानगर या शेतकऱ्याने जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम (१४३) नुसार मौजे देवगांव ता.नेवासा येथील नायब तहसीलदार नेवासा यांच्याकडे रस्ता मिळण्याकामी अर्ज केलेला होता व रस्ता मिळण्यासाठी आमरण उपोषणही केलेले होते त्यामुळे शासनाच्यावतीने नायब तहसीलदार, मंडलाधिकारी आणि कामगार तलाठी यांनी पहील्यांदा केलेल्या उपोषणात या शेतकऱ्याला रस्ता देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतलेले होते माञ आता महीना उलटून जावूनही अद्याप या शेतकऱ्याला रस्ता खुला करुन न दिल्यामुळे या शेतकऱ्याच्या उभ्या पिकांची मोठी नुकसान होत असल्यामुळे दोन दिवसांपासून देडगांव येथे या शेतकऱ्याने रस्ता मिळण्याकामी कामगार तलाठी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे या शेतकऱ्याच्या उपोषणाची तातडीने दखल घेण्याची मागणी सामाजिक संघटनेने केली आहे.

रस्ता
रस्ता

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रस्ता
रस्ता

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रस्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *