मा. सौ. रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानतर्फे दि. २० ऑगस्ट रोजी शरणपूर येथील वृद्धाश्रमात समाजातील सेवाभावी व्यक्तींच्या सहकार्याने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
समाजाचे आपल्यावर काही ना काही ऋण असते. हे ऋण फेडण्यासाठी खारीचा वाटा म्हणून अशा सेवा उपक्रमांचे आयोजन प्रतिष्ठानतर्फे केले जाते. “आज शरणपूर येथील वृद्धाश्रमात जाऊन समाजाचे पांग फेडण्याचा प्रयत्न आम्ही केला,” असे संस्थापिका व भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. अमृता नळकांडे यांनी सांगितले.

सौ. रत्नमालाताई लंघे यांनी वृद्धाश्रमास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच वृद्धाश्रमातील आजी-अजोबा व त्यांची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडी नेवासा तालुका अध्यक्षा सौ. मंगला काळे, शहर अध्यक्षा सौ. नीताताई कडू, सौ. पद्माताई शेरकर, सौ. संगिताताई वाळुंजकर, कु.भार्गवी मापारी,सौ.सुरेखा मगर,ज्योती मगर, श्री. श्रीकांतजी नळकांडे, बाळासाहेब मुटकुळे, संतोष मगर आदी मान्यवर उपस्थित होते.
वृद्धाश्रमातील महिलांचे मनापासून पालनपोषण करणाऱ्या मगर दांपत्यांचे, तसेच त्यांना जमिनीच्या रूपाने आधार देणाऱ्या मगर दादा यांचे विशेष आभार मानण्यात आले. याशिवाय या कार्यास हातभार लावणाऱ्या सर्व सेवाभावी व्यक्तींप्रतीही मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.