नेवासा – नेवासा मुख्याधिकाऱ्यांनी प्रगणक गट व २०११ च्या जनगणनेनुसार १७प्रभागांची तयार केलेली प्रारुप रचना १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली असून या नवीन प्रभाग रचनेमुळे इछुक उमेदवारां बरोबरच मतदारांचा गोंधळ उडाला आहे. मागील वेळेच्या आराखड्यात मोठा बदल झाला असून २१ ऑगस्ट पर्यंत या प्रभाग रचनेस हरकती नोंदवायच्या आहेत.
प्रभाग क्रमांक १ ची व्याप्ती- कडू गल्ली, देशपांडे गल्ली, जुना कोर्ट, सना मेडिकल, पठाण वाडा, काशिविश्वेश्वर मंदिर, मामा भांजे गॅरेज, शासकिय विश्राम गृह. प्रभाग क्रमांक २-तहसिल परिसर, सरकारी दवाखाना, पंचायत समिती, — मराठी- मुलांची शाळा, सरकारी गोड़ाऊन. प्रभाग ३ – मधमेश्वर मंदिर, सेंट मेरी स्कुल, मुळा बाजार, मार्केट यार्ड, मधमेश्वर नगर, नविन कोर्ट, एसटी वर्कशॉप, मधमेश्वर नगरचा पुर्व भाग. प्रभाग ४- संभाजीनगर, सावतानगर, प्रभाग ५- विकास फर्निचर परिसर, कॉलेज समोरील परिसर, चक्रनारायण वसाहत. लोखंडे वस्ती, शिव शंकर कॉलनी, गांधीनगर. प्रभाग ६ – मध्यमेश्वर नगरचा पच्छीम भाग. प्रभाग ७बदामबाई शाळा, मध्यमेश्वर मंदिर, सरकारी धान्य गृह, प्रभाग ८ खोलेश्वर मंदिर, विखोना पेट्रोल पंप परिसर,वकील कॉलनी, टेलिफोन ऑफिस कॉम्प्लेक्स, इस्तेमा ग्राउंड,

प्रभाग ९ – भगतसिंग चौक, खोलेश्वर मंदिर. नगरपंचायत चौक, पाण्याची मोहिनिराज मंदिर परिसर टाकी. प्रभाग १० मोहिनिराज मंगल कार्यालय, व्याप्ती मोहिते चौक, राममंदिर परिसर, काशीविश्वेश्वर मंदिर,न मार्कस मस्जिद, प्रभाग १२ नगरपंचायत कार्यालय, गुजराथी वाडा, प्रभाग १३ – कामिन शहावली दर्गा, नुराणी मस्जिद. प्रभाग १४०- राम मंदिर परिसर, जुने गणपती मंदिर. प्रभाग १५-ज्ञानोदय हायस्कूल, लक्ष्मीनगर, प्रभाग १६ चर्च, गंगानगर, लक्ष्मीनगर, प्रभाग १७खंडाळे वस्ती, मारुती पवार घर, तळपे वस्ती, लोखंडे वस्ती, थोरात वस्ती, निवृत्ती लोखंडे वस्ती, गायकवाड वस्ती. आबा लोखडे वस्ती, घोरपडे वस्ती, भालसिंग वस्ती, हेलवडे वस्ती, गायके वस्ती, जामदार वस्ती. मैदाड वस्ती, शिरसाठ वस्ती, कदम वस्ती, मारुतीनगर.

माजी नगरसेवक व नव्याने उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांनी २०१७ च्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुकीची तयारी सुरु केली होती मात्र झिगझेंग पद्धतीने प्रभाग रचनेनुसार इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. या प्रभाग रचने बाबत मोठ्या हरकती येण्याची चिन्हे दिसत आहेत.
चौकट-लोकसंख्येने प्रभाग ४ सर्वात मोठा तर प्रभाग १ छोटा
दृष्टीने सर्वाधिक लोकसंख्येचा प्रभाग क्र. ४ असून येथे १४६५ लोकसंख्या आहे. तर सर्वात कमी प्रभाग एक मध्ये असून संख्या १२०१ इतकी आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाची सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग १६ मध्ये ४४४ इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग १७ मध्ये ४४४ एवढी आहे. प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या – प्रभाग १ (१२०१), २ (१२५२), ३(१३८७), ४(१४६५), ५(१४०५), ६(१४४८), ७(१३४५), ८(१३०६), ९(१३६५), १०(१३८५), ११(१२८९), १२(१२४३), १३(१३१०), १४ (१३१३),१५(१२७३), १६(१३३७), १७(१२९४).
तीन प्रभाग पूर्वीचेच
२०१७ च्या नगरपंचायत निवडणुकीतील १ ते १७ प्रभागांचे मंबरींग सुद्धा बदलले आहेत १,२ १७ चे प्रभाग क्रमांक तसेच राहिले आहेत. उर्वरित प्रभाग ३. ते १६ प्रभागचे नंबर बदलाबरोबरच झिगझाग पद्धतीमुळे तुटले आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ उडाला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.