नेवासा-समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापु भंडारे यांच्यावर संगमनेर येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा भाजपा नेवासा शहराच्या वतीने निषेध व्यक्त करुन पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रदेश सचिव निरंजन डहाळे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, अहिल्यानगर भाजपआयटी सेलचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ पटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात जाऊन भंडारे महाराज यांना पोलीस संरक्षणाची मागणी केली.

पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की समाजप्रबोधनकार हे.भ.प. संग्रामबापु भंडारे हे दि १६/८/२०२५ रोजी घुलेवाडी ता. संगमनेर येथे हरीनाम सप्ताह मध्ये किर्तन सेवा देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देत असताना घुलेवाडी गावातील कॉंग्रेस समर्थक समाजकंटकांनी चालु किर्तनामध्ये व्यत्यय निर्माण करुन आरडाओरडा करत किर्तन बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे तसेच ह.भ.प. संग्रामबापु यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या वाहनावर मोठाले दगड घालून वाहनाचे नुकसान केले आहे या प्रकारामुळे किर्तनासाठी जमलेल्या माय भगिनींना देखील त्रास सहन करावा लागला हा हल्ला केवळ एका किर्तनावरील हल्ला नसुन हिंदुत्वावर प्रहार करण्याचा सुनियोजित कट आहे.

या हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांचा बोलवता धनी कोण आहे याचा छडा लावणे आवश्यक आहे कारण हे सर्व कॉंग्रेस नेते माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी असल्याने त्यांना चिथावणी व पाठींबा देणाऱ्यांचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे तरी आपण घुलेवाडी ता. संगमनेर येथील झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपींना अटक करावी व समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापु भंडारे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष शिवाजी लष्करे, भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष गणेश लोखंडे, महेश पारखे, गोविंद कदम, गणेश गाढवे, राजेश कडु पाटील, दिनेश गुंजाळ, रामदास लष्करे, अमोल पिटेकर, श्रीराम लष्करे आदी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.