नेवासा – नेवासा शहरात रासने कुटूंबियांच्या कालिका फर्निचर या दुकाणाच्या गोडावूनला अचानक मध्यराञी पाठीमागून लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा गुदमरुन दुर्देवी अंत झाल्याची ह्रदयद्रावक घटना शहरात नुकतीच घडलेली असतांना आणि यापुर्वीही नेवासा नगरपंचायत कार्यालयासमोरच असलेल्या व्यापारपेठेतील दुकाणाला आग लागून मोठे अर्थिक नुकसान झालेले असतांना माञ नगरपंचायतीने खरेदी केलेली नवीकोरी अग्निशमन बंब यंञणा केवळ शोभेची वस्तू ठरल्यामुळे नेवासकरांच्या डोळ्या देखत शहरातील व्यापाऱ्यांची जळालेली दुकाणे आणि आता दोन – चार दिवसांपुर्वी रासने कुटूंबियांच्या दुकाणाला लागलेल्या आगीत पाच जणांचा गुदमरुन झालेला मृत्यु हा केवळ नेवासा नगरपंचायतीकडे असलेला अग्निशमन बंब वेळेवर दाखल न झाल्यामुळेच रासने यांच्या दुकाणाला लागलेल्या आगीने रौद्ररुपधारण केले असल्याची खरमरीत प्रतिक्रिया नेवासकरांतून व्यक्त केली जात असून

ही आग विझविण्यासाठी भेंडा येथून ज्ञानेश्वर कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झालेला असला तरी केवळ चार किमी अंतरावर असलेला नगरपंचायतीचा अग्निमन बंब हा वेळेत आलेला नव्हता त्यामुळे हा नगरपंचायतीचा अग्निशमन बंब म्हणजे ‘आग रामेश्वरी.. अन् बंब सोमेश्वरी’ अशीच म्हणण्याची दुर्देवी वेळ नेवासकरांवर आलेली असून ही अग्निशमन बंबाची यंत्रणा नगरपंचायतीकडे असूनही एकही अनुभवी कर्मचारीच या यंञणेकडे नसल्यामुळे परिणामी नेवासा शहरातील व्यापारपेठ यापुर्वीच उद्धस्त होवून आता दोन – चार दिवसांपुर्वी कालिका फर्निचरला आग लागून पाच जणांचा गुदमरुन मृत्यु झालेला असतांना ही यंञणाच जर कुचकामी ठरली असेल तर या दुर्घटनेत मृत्यु झालेल्या पाच जणांच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या कोणावर ? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा? असा संतप्त सवालही आता उघडपणे नेवासकरांतून व्यक्त केला जात आहे.

रासने यांच्या कालिका फर्निचर या दुकाणाला लागलेल्या आगीत नेवासा नगरपंचायतीच्या या बंबांचा प्रत्यक्षात वेळेवर उपयोग न झाल्यामुळे भेंडे येथून चक्क लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यासह इतर खासगी ठिकाणाहून ही यंञणा दुर्घटनास्थळी दाखल झाली माञ नगरपंचायतीकडे असलेली सुसज्ज यंत्रणा वेळेवर न पोहचताच केवळ शोभेची वास्तू ठरली असल्याचे वास्तव चिञ पाहणीत समोर आलेले असून नेवासकरांनी या नगरपंचायतीच्या अग्निशमन यंञणेवर चांगलाच संताप व्यक्त करत कडक शब्दात ताशोरे ओढून निषेध व्यक्त केला आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे काही महिन्यांपुर्वी नगरपंचायतीच्या बुडाजवळ असलेल्या शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांना आग लागलेली होती परंतु नगरपंचायतकडे यंत्रणाच नसल्यामुळे सर्वांच्या डोळ्यादेखत व्यापाऱ्यांच्या भविष्याचा कोळसा झाला. कालच्या भीषण जळीत दुर्घटनेच्या वेळी अग्निशमन दलाची गाडी सोडा ? साधी चावी आणि ड्रायव्हर सुध्दा जागेवर नव्हते? नगरपंचायत प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे पाच निष्पाप जीवांना वाचविण्यासाठी कोणतेच प्रयत्न करता आले नाहीत याची प्रचंड चिड प्रत्येक संवेदनशील जपणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करुन उभी आहे.
असा कोणता गरकळी कायदा आहे ज्यामध्ये इमारत, गाडी,पायलट व्हॅन येते,त्यावरचा मलिदा खाल्ला जातो आणि ती अग्नीशामक व्यवस्था चालवण्यासाठी आवश्यक यंत्रणाच उभी केली जात नाही.अत्यावश्यक बाबींमधील या महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रस्ताव देऊन ताकदीने पाठपुरावा केलाच नाही असे अप्पलपोटे अधिकारी असतील ? तर अशा अनेक प्रकारे शहराचा नास निश्चित होण्याची शक्यता नाकारता येत नाही
– डॉ.करणसिंह घुले, सामाजिक कार्यकर्ते
अध्यक्ष : समर्पण फांऊडेशन नेवासा


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.