नेवासा – शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रासने कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले
त्यांच्या समवेत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड अजित काळे हे उपस्थित होते
सोमवारी नेवासा फाट्यावर कालिका फर्निचरच्या गोदामास आग लागून रासने कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू गुदमरून मृत्यू झाला.या ह्रदय द्रावक घटनेने नेवासा शहरावर शोक कळा पसरली आहे.खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी रात्री अरुण रासने यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले

खासदार वाकचौरे म्हणाले की मी नेवासा येथे गट विकासअधिकारी असल्या पासून रासने कुटूंबाचे आणि माझे स्नेहाचे संबंध असून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे
रासने कुटुंबाचे कधीच न भरून येणारे नुकसान झाले आहे,या दुःखद प्रसंगी मी रासने परिवारासोबत असून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील अशी ग्वाही दिली
यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड.अजित काळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,माजी उपसरपंच गोरखभाऊ घुले,डॉ करणसिंह घुले,नितीन जगताप,स्वप्नील मापारी,युवा सेनेचे नीरज नांगरे,मंडल अधिकारी अनिल गव्हाणे,खासदार वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे यावेळी उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.