नेवासा : कर्जाचा डोंगर आणि कपाशीला खत व फवारणीसाठी औषध घ्यायला पैसे नसल्याने श्रावणी पोळ्याच्या पूर्वसंध्येला (दि.२१) विषारी औषध प्राशन करत शेतकऱ्याने आत्महत्या केली. आठवडाभरात नेवाशातील ही दुसरी आत्महत्या आहे.
नानासाहेब केशव ठोंबळ (वय ४९, रा. गोयगव्हाण) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नानासाहेब केशव ठोंबळ हे कर्जाचा वाढता डोंगर आणि कपाशीसाठी खत आणि औषधे घ्यायला पैसे नसल्याने चिंतेत होते. त्याच चिंतेत त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

आठ दिवसात आत्महत्येची नेवाशातील ही दुसरी घटना आहे. वडूले येथील बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याने १७ ऑगस्टला विष घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आता नानासाहेब ठोंबळ या शेतकऱ्याने जीवन संपवले. नानासाहेब ठोंबळ यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई असा परिवार आहे.
अंत्यविधीसाठी लोकवर्गणी
आर्थिक चिंतेतील ठोंबळ यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबियांकडे पैसे नसल्याने ग्रामस्थांनी वर्गणी काढून पैसे काढत अंत्यसंस्कार केल्याचे प्रहार संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे यांनी सांगितले. या आत्महत्या नाही तर सरकारी धोरणाने घेतलेले बळी असल्याचा आरोप प्रहारने केला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

