सोनई : येथे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने चार ठिकाणी नुकतीच कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ४ आरोपींकडून ४२ हजार पाचशे रुपयांची गावठी दारू व दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन पकडले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांना घोडेगाव येथे हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली.

घोडेगाव येथील चार ठिकाणी पथकासह छापा टाकला असता, राजेंद्र साबळे (रा. घोडेगाव) यांच्याकडे ५ हजार रुपये किमतीची ५० लिटर गावठी हातभट्टीची दारू, लक्ष्मण कुऱ्हाडे (रा. घोडेगाव) याच्याकडे ४ हजार पाचशे रुपये किमतीची ४५ लिटर दारूं, संजय गायकवाड (रा. घोडेगाव) यांच्याकडे चार हजार पाचशे रुपयांची ४५ लिटर व दहा हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन, असा एकूण १४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल, सुधाकर कुऱ्हाडे (रा. घोडेगाव) याच्याकडे १८ हजार पाचशे रुपये किमतीचा गावठी दारू व कच्चे रसायन जप्त करण्यात आले आहे.
या सर्व आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक, सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशाने पोलीस नाईक सोमनाथ झांबरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, योगेश कर्डिले, अमोल आजबे यांनी ही कारवाई केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

