श्रीरामपूर – शहराच्या शेजारील शिरसगाव हद्दीत असलेल्या भोंगळ, शेलार वस्ती परिसरात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटलांच्या आदेशाने मा.नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे व मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील यांच्या प्रयत्नाने तब्बल ३५ वर्षानंतर नगरपालिकेच्या थत्ते मैदान येथील पाण्याच्या टाकीपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीरामपूर शहराच्या हाकेच्या अंतरावरील शिरसगाव हद्दीतील भोंगळ, शेलार वस्ती परिसरात १९९० पासून नागरी वसाहत आहे. नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी शहरातून पायपीट करावी लागत होती. शहरातील थत्ते मैदान परिसरातील पाण्याच्या टाकीतून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मिळावी ही मागणी सातत्याने होत होती. मात्र तब्बल ३५ वर्षे राजकीय उदासीनतेमुळे याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिले नाही. निवडणूक काळ जवळ आला की, कायमच काही हौशी उमेदवार परिसरात येऊन आश्वासनांची खैरात वाटत स्टंटबाजी करत होते.

या परिसराला शहर हद्दीतून जोडणारे रस्ते व पाण्याच्या पाइपलाईनद्वारे पाणी देत कायमस्वरूपी पर्याय काढण्यासाठी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे व माजी नगरसेविका स्नेहल खोरे यांनी पुढाकार घेतला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवादनगर ते शेलार वस्ती रस्त्याचे खडीकरण पूर्ण करण्यात आले. सोबतच थत्ते मैदान पाणी टाकी ते शिरसगाव हद्द पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली. शिरसगाव ग्रामपंचायतने भाजप नेते गणेश मुदगुले व संदीप वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण हद्दीत लाईनची जोडणी केली. त्यामुळे तब्बल ३५ वर्षानंतर भोंगळ,शेलार वस्तीत पिण्याचे पाणी पाईपलाईनद्वारे आले. कायमस्वरूपी रस्ता व पाण्याची समस्या सुटल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, मा.नगरसेविका स्नेहल खोरे यांचे आभार मानले जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.