नेवासा – भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार गाव चलो अभियान अंतर्गत नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील जैनपूर येथील भाजप कार्यकर्ते किशोर भाऊ डिके यांच्या वस्तीवर भाजप जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली गाव चलो अभियाना अंतर्गत भाजप बूथ बैठकीस उस्फूर्त प्रतिसाद जैनपूर ग्रामस्थ व परिसरातील नागरिकाकडून मिळाला. बैठकीदरम्यान बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे विविध उपक्रम व बूथ सक्षमीकरण ,शक्ती केंद्रप्रमुख युवा वॉरियर्स यांची जबाबदारी समजावून सांगितली. व यावेळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे राहून भारतीय जनता पार्टी पक्ष तालुक्यात मजबूत करण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

त्यानंतर काही कार्यकर्ते नी आपले मनोगत व्यक्त करून येणाऱ्या अडचणी व विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या नेतृत्वाने जैनपूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आज जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे पाटील यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व उत्तर नगर जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांचे विकासाभिमुख नेतृत्व स्वीकारून भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला व यापुढे ही भाजप युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा काम करण्याचा निर्धार याप्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांनी केला त्यामध्ये शरद डिके रवींद्र डिके रामेश्वर डिके संदीप डिके संदीप डिके किशोर डिके योगेश डिके कुमार महाराज डिके अशोक भागवत भगवान महाराज डिके सचिन साठे महेश डिके सुनील डिके प्रताप डिके बाळासाहेब गीते संतोष डिके बाबू नाना तागड आप्पासाहेब शिंदे योगेश डिके ,सोमनाथ आव्हाड,अप्पासाहेब शिंदे,महेश डिके,संजय वैष्णव गणेश बाबासाहेब डिके जितेंद्र डिके पप्पू नवले गौरव डिके परसराम डिके भगवान बैरागी संजय बैरागी ज्ञानेश्वर डिके.. आधी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज भाजप बूथ बैठकीत जाहीर प्रवेश केला,बूथ बैठकी प्रसंगी नानासाहेब डौले ,एडवोकेट बापूसाहेब दारकुंडे, जिल्हा भाजप प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे, गोविंद कदम, कुणाल बोरुडे गणेश चौगुले, आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.