नेवासा – तालुक्यातील भानस हिवरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनी पावसामुळे मुलांचे कार्यक्रम झाले नव्हते. पालकांच्या व ग्रामस्थांच्या विनंतीवरून मुलांचा उत्साह पाहून शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी नऊ वाजता जल्लोष स्वातंत्र्याचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये शाळेतील मुलांनी संगीत कवायत,लेझीम, देशभक्तीपर गीतांवर आधारित कार्यक्रम सादर केले. गावातील सर्व पालक व ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रम पाहून पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मुलांवर बक्षीसांचा वर्षाव केला.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेत सुरू असलेल्या विकास कामांना स्वातंत्र्य दिनापूर्वी माजी विद्यार्थी संघाने व्हाट्सअप च्या माध्यमातून दोन दिवसात रोख व वस्तुरूपाने मिशन आपुलकी अंतर्गत 53 हजार 700 रुपयांची मदत केली. व सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी उपयोग करता येतो हे दाखवून दिले.कार्यक्रमाच्या दिवशी रोख स्वरूपात 25 हजार रुपये बक्षीस म्हणून जमा झाले. श्रीराम ग्रामीण बिगर शेती पतसंस्था,मुनोत कुटुंबीय,सुंदरताई साळुंके मॅडम यांच्या वतीने शाळेतील मुलांना प्रमाणपत्र ट्रॉफी व रोख स्वरूपात बक्षीसे दिली. पालक ग्रामस्थ मान्यवरांच्या हस्ते मुलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

श्रीराम पतसंस्था यांचे वतीने शाळेतील विकास कामांसाठी रोख 15 हजार रुपये दिले. पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये होत असलेले बदल व मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये होत असलेली प्रगती पाहून सर्व पालकांनी खूप समाधान व्यक्त केले.यावेळी पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना बक्षीसांचा वर्षाव केला.
कर्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, महिला, पालक वर्ग, ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.