गणेशवाडी – तालुक्यात छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्ग हा वडाळा बहिरोबा ते अहिल्यानगर महामार्गावर सध्या रस्त्यात खड्डे कि खड्डयात रस्ता हेच या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना समजायला तयार नाही. वडाळा , घोडेगाव ते अहिल्यानगर एकूण ४५ किलोमीटर अंतर असलेला प्रवास त्यासाठी आता तब्बल तीन ते चार तास लागत आहे. घोडेगाव येथे या मार्गावर अवघे दोन खड्यासाठी तब्बल वीस लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे घोडेगाव येथील ग्रामस्थांनी बोलताना सांगितले. बांधकाम विभागातील इंजिनिअरच्या पाहुण्याला सदर काम देण्यात आले मात्र सदर ठेकेदार पाहुण्याने काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असून अवघ्या काही दिवसांतच या ठिकाणची परीस्थिती पहील्या सारखीच झाली आहे. या ठिकाणी अनेकदा मोठमोठे अपघात देखील या खड्यांमुळे झालेले आहेत.

त्यामुळे अनेकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. हे खड्डे बुजविण्याचे टेंडर तुषार सोनवणे अँड कंपनी ने एक ते सव्वा कोटी रुपयांना घेतले होते. परंतु यावर वरीष्ठ पातळीवर देखरेख करणारे इंजिनिअर व ठेकेदार दोघे पण पाहुणे असल्याचे समजते. यांच्या नातेसंबंधांची झळ मात्र या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना बसते आहे. या दोघांनी मिळून मात्र शासनाचे एक ते सव्वा कोटी पाण्यात घातले. याबाबत संबंधित विभागाचे इंजिनिअर यांच्याशी संपर्क साधला असता मला याबाबत काहीही माहिती नाही असे सांगून हात वर केले सदर कामाचे इस्टिमेट कितीची आहे याचे विचारणा केली असता तो दुसऱ्याकडे बोट दाखवून आपल्याबरोबर आपल्या पाहुण्याची कातडी बचाव धोरण घेत असल्याचे दिसून येत आहे सध्या पावसाळा सुरू असून महामार्गावर प्रवास करणे सुद्धा अवघड होऊन बसले आहे

शासनाने खड्डे बुजवण्यासाठी एक सव्वा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असला तरी प्रत्यक्षात किरकोळ स्वरूपाची डागडुजी करून काही ठिकाणी चक्क माती मिश्रीत मुरमाचा वापर केला आहे. या ठेकेदारांची संबंधित कामाची मुदत संपण्यासाठी अद्याप आठ दिवस बाकी आहे. त्यामुळे सदर ठेकेदार व इंजिनिअर यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
या खड्यामुळे वाहतूक कोंडी नेहमीच होत असल्याने आमच्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम होतो आहे. तरी
संबधित ठेकेदार व इंजीनिअर यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे .
– पंकज लांभाते, व्यापारी घोडेगाव.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.