सोनई – मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून सोनई गावातून मराठा समाजासाठी ‘शिदोरी’ रवाना करण्यात आली आहे. सोनईसह परिसरातून माजी सभापती सुनीलराव गडाख यांच्यासह तरुणांच्या पुढाकाराने
रवी दि 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता
घरगुती भाकरी, चटणी, लोणचं, चिवडा, पाण्याच्या बाटल्या अशा जीवनावश्यक गोष्टींसह भरलेली गाडी सोनई येथून मुंबईकडे रवाना करण्यात आली या उपक्रमात फक्त मराठा समाजच नव्हे तर मुस्लिम आणि इतर समाज बांधवांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मुंबईत जोरदार पावसात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो बांधव आंदोलन करत आहेत. त्यांनी आपल्या घरदाराचा त्याग करत रस्त्यावर येऊन आरक्षणासाठी संघर्ष सुरू केला आहे. त्यांच्या या लढ्याला बळ द्यावे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेतून सोनई व परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला.
“मराठा समाजासाठी सुरू असलेल्या या लढ्याला सर्वांनी तन, मन, धनाने मदत करावी,” असे आवाहन माजी अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनीलराव गडाख यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सचिन चांदघोडे,गणेश गडाख,भाऊराव चांदगुडे ,गणेश निमसे, अनिल निमसे, डॉ संकेत दरंदले,दिनेश जंगले, आकाश गडाख,देविदास लांडे,शिवम दरंदले,
आदींसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

मराठा बांधवाच्या लढ्यात आपलेही सहकार्य राहावे या हेतूने
सोनईमधील मुस्लिम बांधवानीही आपल्या घरून भाकरी व मिरचीचा ठेचा व पाणी बॉटल स्वतःहून गाडीत सुपूर्द केल्या.
सोनईकरांकडून दीड लक्ष रुपयांचा किराणा…
सोनई परिसरातून मा सभापती अर्थ पशुसंवर्धन
सुनीलराव गडाख यांच्याकडून पन्नास हजार रुपयांचा किराणा तसेच
अनिल दरंदले, राजेंद्र गुगळे,सुभाष राख, रणजित जाधव, सुभाष शिरसाठ, दादासाहेब वैरागर, मयूर बनकर यांच्याकडून एकत्रितपणे 1 लक्ष रुपयांचा किराणा देण्यात आला तसेच
घोडेगाव येथून 8000 पाणी बॉटल 1 ली च्या,200 की फरसाण 400 पुडे,1500 बिस्कीट पुडे काल घोडेगाव येथून पाठवण्यात आले आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.