नेवासा : १६ व्या एशियन रायफल शूटिंग स्पर्धेत चि. वेदांत नितीन वाघमारे याने तीन सुवर्ण व एक कांस्य पदक पटकावत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती ,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा मान उंचावला आहे.
या ऐतिहासिक यशानंतर त्रिमूर्ती परिवाराकडून वेदांतचे उत्साहात स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभास संस्थेच्या अध्यक्षा सुमिती घाडगे मॅडम, आदरणीय स्नेहल घाडगे दीदी, आद श्रुती घाडगे पाटील, आद चेतन सर, सचिव मनीष घाडगे, डॉ. अनुराधा गोरे, प्रा. डॉ.चांगदेवराव आरसुळे , उपप्राचार्य प्रा.निकिता बर्गे, प्रा.संतोष जावळे , प्रा.सोमनाथ खेडकर, प्रा.योगिता गायकवाड, प्रा.अक्षय देवतरसे,

प्रा.अनिकेत आरसुळे, प्रा.गोरख गुंड, प्रा.अश्विनी औटी , प्रा.वैष्णवी मिसाळ, प्रा.प्रवीण आवारे, प्रा.राहुल बोरुडे, प्रा.पल्हारे, प्रा.प्रांजल थोरात, प्रा.मंगेश वैरागर तसेच क्रीडा व सैनिकी प्रशिक्षक, इतर पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आदरणीय संस्थापक साहेबराव घाडगे साहेबांनी विद्यार्थ्यांसाठी पाहिलेले ऑलम्पिक पदकाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
वेदांतच्या कामगिरीबद्दल त्रिमूर्ती परिवाराकडून गौरव करण्यात येऊन त्याला पुढील ऑलम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.