विशेष ग्रामसभा घेऊन ठराव घेणार – सरपंच श्री वामन तुवर
नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – गाव नकाशा प्रमाणे असलेले शेतीचे रस्ते , गावशिवरस्ते अतिक्रमणमुक्त करणे व मोफत मोजणी करून खुले करणे तसेच शासनाच्या मदतीने रस्ते पक्के बनविणे व पाचेगाव नेवासा तालुक्यातील पहिले अद्ययावत शेत रस्ते सीमांकन व रस्त्यांना क्रमांक देणे बाबत मॉडर्न रोड मॉडेल व्हिलेज बनविण्याचा ठराव करण्याबाबत जनजागृती करण्यात आली शेत रस्त्यांची यादी करण्यासाठी गाव शिवार फेरी कार्यक्रम आयोजित करून विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी केले
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे मॉडर्न रोड मॉडेल व्हिलेज संबंधात जनजागृती बाबत सभा दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाली मॉडर्न रोड मॉडेल व्हिलेज ही संकल्पना महाराष्ट्र राज्य शेत व शिवपाणंद रस्ते चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरदराव पवळे यांच्या संकल्पनेतून पुढे आली आहे

त्या संबंधातील माहिती महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी विषद करून या अंतर्गत नुकत्याच 29 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे नकाशावर असलेली रस्ते वहिवाट आहे परंतु नकाशावर नसलेली रस्ते गाव ते तालुक्यापर्यंत शहरापर्यंत जाणारी रस्ते 143 खाली प्रकरणेअसलेले रस्ते मामलेदार ॲक्ट 1906 च्या पाच दोन खाली असलेली रस्ते म्हणजे सर्व ग्रामीण शेत रस्ते व गावच्या चारही शिवरस्त्यांचे गाव शिवार फेरी घेऊन यादी करणे व विशेष ग्रामसभेत ठरावाने मंजूर करून घेणे व तहसीलदारांना सादर करणे व पुढील कार्यवाहीसाठी मोफत मोजणी व अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार नेवासा व तहसीलदार मार्फत भूमी अभिलेख नेवासा यांचेकडून करून घेण्यासाठी पत्र व्यवहार करावा . त्यासाठी ही चळवळ संपूर्ण पाठपुरावा करणार आहे .असे स्पष्ट केले शेतीसाठी रस्ता हा शेतकऱ्यांचा श्वास आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले .

प्रास्ताविक सरपंच श्री वामन भाऊ तूवर यांनी केले अतिक्रमित रस्त्यासंबंधी असलेली प्रकरणे निपटारा करण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून आपणही सक्रिय होणार आहोत असे यावेळी त्यांनी सांगितले ग्राम विकासअधिकारी , ग्राम महसूल अधिकारी{ तलाठी} श्री सोपानराव गायकवाड यांनी शासन निर्णयाची माहिती दिली व वाचन केले .या सभेचे वेळी चळवळीचे कार्यकर्ते श्री मुरलीधर जरे व मतीन खान पठाण यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी चळवळीचे कार्यकर्ते श्री बाळासाहेब थोरात, कानिफनाथ कदम,प्रशांत चौधरी, सगाजी ऐणर, विठ्ठल करमड, हरिभाऊ तुवर, पाचेगाव ची ग्रामपंचायत सदस्य श्री ज्ञानदेव द्वारकानाथ आढाव सर अण्णासाहेब विठ्ठल जाधव ज्ञानदेव आचपळे तुकाराम आचपळे विठ्ठल तू वर दीपक शिंदे धनराज जाधव ज्ञानेश्वर मतकर विक्रम जाधव इत्यादी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.